सायलेज मुरघास काय आहे ?
![]() |
| सायलेज (मूरघास) बॅग |
सायलेज म्हणजे मुरघास. जनावरांना तंतुमय हिरव्या चाऱ्याला प्राणवायू विरहीत अवस्थेत आंबवायला चाऱ्याचे छोटे-छोटे तुकडे केले जातात. त्यांना ठासून-ठासून त्यातील प्राणवायू बाहेर काढला जातो. आणि चाऱ्याची प्लास्टिक आवरणात गाठोडी बांधण्यात येतात. यामुळे चाऱ्यांच्या गाठोड्यामध्ये प्राणवायू विरहीत अवस्था निर्माण होते. आंबवणे प्रक्रियेत चा-यामधील नैसर्गिक रित्या असलेले सूक्ष्म जीवाणू नाशक द्रवपदार्थ आहेत. त्यामुळे साधारणतः ४८ दिवसांत मद्यार्क निर्माण करणारे जीवाणू मारले जातात. पुढची मध्यार्क निर्मिती आपोआप थांबते आणि हिरव्या चाऱ्याचे रुपांतर सोनेरी पिवळ्या, मध्यार्काचा मोहक सुगंध असलेल्या सायलेजमध्ये होते. हि प्रक्रिया लोणचे करण्याच्या प्रक्रीयेसारखी असते. हे सायलेज प्लास्टिक आवरणात १ वर्षापर्यंत टिकते. तसेच जनावरे मध्यार्काच्या सुगंधामुळे आवडीने खातात. त्याचबरोबर अनेक पोषक तत्वे असल्यान दुध उत्पादनात वाढ होते. सायलेज हा चारा वापरून अनेक राष्ट्रांनी त्यांच्या दुध उत्पादनात क्रांती केलेली आहे.
सायलेज बनविण्याची प्रक्रिया
आपल्याला अख्खा गहू पचत नाही. पण तोच गहू दळून, कणिक भिजवून भाजला कि, आपण चपातीच्या
![]() |
| मका कापणीसाठी उपयुक्त चारा कुट्टी मशीन |
स्वरूपात सहजरीत्या पचवू शकतो. हिरव्या चाऱ्याची पाचकता त्यामध्ये असणाऱ्या लिग्निन बॉंडमुळे कमी असते. आंबविण्याच्या प्रक्रियेत हे लिग्निन बॉंड तुटतात आणि बंधक असलेली अनेक पोषणतत्वे जनावरांना उपलब्ध होतात. त्यामुळे सायलेजची पाचकता आणि त्यामधून मिळणारी पोषणतत्वे हि हिरव्या चाऱ्याच्या १.८ पट म्हणजे जवळजवळ दुप्पट असतात.
रवंथ करणाऱ्या जनावरांची पाचनक्रिया :
रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचे ४ कप्पे असतात. रुमेन, रेटीक्युलम, ओमेझन आणि अबोमेझम. या पैकी रुमेन हा सर्वात मोठा कप्पा आहे. जानावरांच्या पाचनक्षमतेला या रुमेनच्या क्षमतेची मर्यादा असते. त्यामुळे रुमेनच्या मर्यादेत आपण जितकी पोषणतत्वे भरू शकू तितकी दुध उत्पादनाला मदत होते.
रवंथ करणाऱ्या जनावरांना सायलेज खाऊ घालण्याचे फायदे :
रवंथ करणाऱ्या जनावरांना सायलेज खाऊ घालण्याचे फायदे :
- सायलेजला मोहक सुगंध असल्यामुळे जनावरे आवडीने खातात आणि दुध उत्पादनात वाढ होते.
- प्लास्टिकच्या आवरणात, प्राणवायूविरहीत अवस्थेत सायलेज वर्षभर टिकते. त्यामुळे साठवणीची अडचण निर्माण होत नाही.
- सायलेजची गुणवत्ता, पौष्टिकता एकसारखी असल्यामुळे रुमेनमधल्या सूक्ष्म जीवाणूंची पाचन क्षमता वाढते. त्यामुळे जास्त दुध वाढ होण्यास मदत मिळते.
- हिरव्या चाऱ्याच्या तुलनेत सायलेज मध्ये जवळजवळ दुप्पट पोषणतत्वे असल्यामुळे जास्त चाऱ्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
- इजराईल देशात जनावरांना वर्षभर फक्त सायलेज खाऊ घातले जाते. तेथील उत्पादन क्षमता सरासरी जास्त आहे.
मुरघास सायलेज निर्मिती उद्योग
![]() |
| सायलेज मुरघास निर्मितीची छोटी मशीन |
जनावरांच्या खाद्यासाठी व दुध उत्पादन वाढीसाठी उपयोगी सायलेज हे इजराईल सारख्या देशात कायमस्वरूपी खाद्य म्हणून वापरले जाते. सायलेज मुळे इजराईल देशाने दुध उत्पादन क्षेत्रात प्रगती केली आहे. पारंपारिक पद्धतीने बॅग मध्ये किंवा टाकीमध्ये साठवून साय्लेज बनविता येते परंतु अत्याधुनिक स्वयंचलित माशिनिंच्या माध्यमातून उत्कृष्ठ प्रतीचे साय्लेज बनविता येते. प्रगत राष्ट्रांत अशा माशिनिंच्या माध्यामतून सायलेज निर्मिती करून त्याची विक्री केली जाते. महाराष्ट्रात सुद्धा ५ ते ७ रु. किलो प्रमाणे सायलेज विक्री होत आहे. १२ महिने चारा उपलब्ध नसल्याने तसेच दुध उत्पादन वाढ होत नसल्याने शेतकरी सायलेज (मुरघास) जनावरांना खाऊ घालतात. आपण स्वतः अथवा शेतकरी उद्योजक एकत्र येऊन अथवा शेतकरी उत्पादक/कंपनी वा गटाने मशीन खरेदी केल्यास त्याचा सर्वांना फायदा होईल. छोट्या स्वयंचलित मशीनची किंमत १० ते ११ लक्ष रुपये आहे. त्याचबरोबर चारा कुट्टी मशीन अंदाजे १ लक्ष रुपयापर्यंत येते. यामध्ये जास्तीत जास्त ४ ते ५ लेबर लागतात. त्यामुळे रोजगार निर्मिती सुद्धा होते. तसेच मका हे ६० दिवसांचे पिक असल्याने कमी वेळात चारा विक्री करून शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांशी काँट्रॅक्ट करून मका (कच्चा माल) सहज उपलब्ध होईल.
सायलेज (मुरघास) विक्री :
सायलेज किंवा मुरघास विक्री करणे सोपे आहे. यासाठी वेगळे मार्केट हुडकण्याची गरज नाही. प्रत्येक गावात दुध संकलन केंद्र डेअरी असतेच. या व्यवसायिकांना सदर सायलेज बॅग कमिशन तत्वावर विक्रीसाठी दिल्यास ते त्याची विक्री स्थानिक ठिकाणी करतील. कारण पशुपालक जे ग्राहक आहेत. त्यांच्याशी या व्यवसायिकांचा दररोज संपर्क येतो. अश्या पद्धतीने डेअरी व्यवसायिकाला अतिरिक्त नफासुद्धा मिळेल.
www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*
प्रगतिशील शेतकरी, कृषितज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, कृषी संस्थांचे पदाधिकारी, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी व शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहे. सर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहे. पण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहे. आज प्रत्येक जण लेखक आहे. प्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञान, सल्ला, कृषीविषयक माहिती, महत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल. जगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. कृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.
आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतीसल्ला, उपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध करा. कृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी व तज्ञांनी आपले लेख, माहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.
*मोफत जाहिरात : आपली कृषी विषयक उत्पादने व सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. पोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवा. शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती व मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने व सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहे. त्वरा करा, एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जा. आपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.
*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*
www.shetisalla.com नियम व अटी :
*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.
*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज व टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.
*लेख हे स्वतःचे असावे. कॉपी नसावे.
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
![]() |
| अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
![]() |
| अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |











0 Comments