Recents in Beach

For More Details Call On 9673371785

शेतकरी उत्पादक कंपनी

कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. : शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी
सहकाराच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्था सुरू झाल्या होत्या, त्यांचे संपूर्ण हित साधण्यात कमी पडल्या. शेतकऱ्यांनी या संस्थांमध्ये भरभरून सहभाग घेतला, गुंतवणूक केली आणि सहकार तत्त्व अंगीकारले. परंतु, ज्या लोकांच्या हातात या संस्थांचे नेतृत्व आले, त्यांनी मूळ उद्देश विसरून कामकाज केल्यामुळे आज सहकार मोडकळीस आलेले आपल्याला दिसते. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रा. वाय. के. अलघ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने भारतीय कंपनी स्थापना कायद्यामध्ये सुधारणा करून प्रोड्यूसर्स कंपनी स्थापना कायदा २००२ निर्माण केला. प्रोड्यूसर्स कंपनी ही सहकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संकर आहे. त्यामध्ये सहकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चांगले चांगले गुण एकत्र करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रोड्यूसर्स कंपनीचा कायदा बनवण्यात आला आहे. कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी वरील सर्व गुण अंगिकरून निर्माण झाली आहे.
For More Information Click On Image Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी इमेज वरती क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०, ९८९००९८२६५ 

कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सभासद हे प्राथमिक उत्पादन करणारे म्हणजे शेतकरी, दूध व ऊस उत्पादक आहेत. कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लहान शेतकरी आणि उत्पादकांना एकत्र करून त्यांना उत्पादनपूर्व काळात शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते-औषधे, आर्थिक सहाय्य, मशागतीच्या सुविधा, पीक व शेतकरी विमा आणि उत्पादन काढणी पश्चात एकत्रित विक्री व्यवस्था, ऊस व दुग्ध प्रक्रिया आणि बाजाराच्या मागणीनुसार शेतमाल उत्पादन इ. निर्माण करणे हा आहे. या मागील सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची किंवा उत्पादकांची होणारी लूटमार थांबवून उत्पादनासाठी आवश्यक असलेले साहित्य थेट उपलब्ध करणे व उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उत्पादक ते ग्राहक विक्री साखळ्या उभ्या करणे हा आहे. कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांचा एकत्र येण्यामागील हेतू, उत्पादन आणि भौगोलिक परिस्थिती, एकत्र येण्याची गरज, बाजारात येणाऱ्या अडचणीं सारख्याच आहेत. कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्राथमिक उत्पादकांबरोबर गट व शेतकरी समूहांच्या बरोबर काम करणारी आणि प्राथमिक उत्पादकांच्या उत्पन्न वाढीसाठी/आर्थिक स्थैर्यासाठी कार्य करणारी शेतकरी उत्पादक संस्था आहे. सामाजिक कार्याने प्रेरित असलेल्या आणि प्रोड्यूसर्स कंपनीमध्ये कुठलाही स्वार्थ नसणारा शिवशक्ती समूह कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या उन्नतीसाठी कार्य करत आहे. शिवशक्ती समूहाच्या मार्गदर्शनाखाली आणि पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून शेतकऱ्यांच्या सेवार्थ कंपनीची स्थापना केली आहे.


सामाजिक कामाचा व शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या व त्यावर उपाय यांचा प्रगाढ अभ्यास असणारे प्रमोदभाऊ मांडवे यांचे सक्षम नेतृत्व कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चा विकास आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमण करीत आहे. आजपर्यंत शिवशक्ती समूहाच्या माध्यमातून १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना शासकीय व खाजगी योजनांचा लाभ मिळाला आहे. तसेच २५ लाख रुपयांपेक्षा जास्त खते, बी-बियाणे, औषधे वाटप आदी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ सामाजिक कार्य शिवशक्तीच्या माध्यमातून होत आहे. कृषी प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकरी सक्षमीकरण हे धोरण पुढे नेऊन शिवशक्ती अन्नदात्याला सुखी, समाधानी करण्याचे कार्य अविरत करीत आहे. हमीभाव, नैसर्गिक आपत्ती, चुकीचे शासकीय धोरण, दुष्काळ, शेतकरी एकीचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, बेरोजगारी आणि विविध शेती समस्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे शेतकरी एकत्र करून स्वतःच सामूहिक पद्धतीने कृषी उत्पादन घेणे, त्यावर प्रक्रिया करणे, उपपदार्थांची निर्मिती करणे, स्वतःच विक्री करणे आणि सर्व शेतकऱ्यांच्यात नफा वाटून घेणे अशी रचना कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. ची केली आहे.

शेतकरी हितार्थ उत्पादक शेतकरी यांना कंपनीच्या माध्यमातून विविध सवलती आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना शासन राबवित आहे. अट फक्त हीच आहे की तो शेतकरी हा शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद असावा. शेतकरी उत्पादक कंपनी संदर्भात शासकीय योजनांचा लाभ घेणेसाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद असणे बंधनकारक आहे. या शासकीय योजनांचा लाभ आपणास मिळवून देणेसाठी ' कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.' ही शेतकरी उत्पादक कंपनी पाठपुरावा व सर्वोत्तपरी सहकार्य करणार आहे. आपणास आव्हान आहे की, आपण आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक सामजिक प्रगतीसाठी, परिवर्तन आणि नवनिर्मितीसाठी, लाचारी आणि बेरोजगारीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ' कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.' या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स घेऊन सभासद व्हावे आणि आपला सर्वांगीण विकास साधावा.

#शेअर्स : सर्व इच्छुक शेतकरी व नागरिक आणि बंधू भगिनींनो आपल्या कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स खालीलप्रमाणे दिले जात आहेत. कंपनीचा एक शेअर १०००/रुपये या दर्शनी किंमतीचा असून सभासदांना किमान १ शेअर घ्यावे लागतील त्याची किंमत १,०००/- रुपये एक हजार फक्त तसेच प्रवेश फी १००/- रुपये शंभर फक्त असे एकूण ११,००/- रुपये अकराशे फक्त आहे. सदर रक्कम चेक, डीडी, NEFT, इंटरनेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करावी. पारदर्शकता असावी यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470, 9673371785, 9890098265, 9960007383
CIN NO. : U01400PN2018PTC179761
PAN NO. : AAHCK3348P
TAN NO. : KLPK03069D
Bank A/ C. : Bank Of Maharashtra
Branch. : Kadegaon
A/C No. : 60317650012
ISFC Code.: MAHB0001636

#Kadegaon Taluka Farmers Producer Co. Ltd.
#शेतकरी_सक्षमीकरण_हेच_आमचे_धोरण
#कडेगांव_तालुका_फार्मर्स_प्रोड्युसर_कंपनी_लि.


अधिक माहितीसाठी इमेज वरती क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०, ९८९००९८२६५
अधिक माहितीसाठी इमेज वरती क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०, ९८९००९८२६५ 




Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments