Recents in Beach

For More Details Call On 9673371785

शेतकरी सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीचा यशस्वी प्रयोग

आता निवड तुमची, लाचारी करायची का स्वाभिमानाने जगायचं

होय ही निवड तुम्हीच करायची आहे. वर्षानुवर्षे आपण या काळ्या मातीत घालवली. आजा, पंजा आणि आपले सर्व पूर्वज या मातीत घासून-घासून स्वर्गवासी झाले. त्यांचे आणि आपले पाय या भांडवलदारांच्या आणि पुढाऱ्यांच्या संस्था मोठे करण्यात खपले. घर-दार, जमीन-जुमला सर्वकाही विकून आपण या लोकांच्या कंपनी- उद्योगांचे शेअर्स घेतले. तुम्हीच मालक हे ऐकून आपले कान सुन्न झाले. पण खरा शेतकरी मालक कधीच झाला नाही. संस्थाचालक, पुढाऱ्यांना गाडी, जमीन, प्रतिष्ठा सगळं काही मिळालं. तुम्ही घेतलेल्या शेअर्स च्या जीवावर ते आमदार- खासदार झाले. तुम्ही आम्ही मात्र फक्त नामधारीच राहिलो.
ऊस आणि दुधाचं राजकारण बघितलं. गल्ली बोळात नागवे बोंबलत फिरणारे मोठ्या गाडीतून कांजी कपडे घालून फिरताना पाहिलं. आपण मात्र फाटक्या कपड्यावरून संपूर्ण नागवं झालो. कारखानादाराचं पोरग दादासाहेब, भय्यासाहेब, अण्णासाहेब आणि काकासाहेब झालं. आपलं पोरग बाब्या, गोम्या, सोम्याच राहिलं. का आली ही वेळ? काय झालं? कोणतं पाप केलं ते आज भोगायला आलं या शेतकऱ्याला? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारचं महापापी असतो. आम्हीही तेच केलं. अन्याय सहन करत राहिलो आणि या लोकांची घरे यांच्या संस्थाचे शेअर्स घेत पुन्हा-पुन्हा भरत राहिलो. आपण कधीही आपल्या सामान्य शेतकरी भावाला मदत केली नाही. याउलट त्याचे वाईट चिंतन करून त्याला दूर लोटन्याचे पाप आपण केले. आपण एकत्र आलो नाही. कोणताही प्रक्रिया उद्योग, व्यवसाय एकत्र आणि सामूहिक पद्धतीने केला नाही. हे पाप आपण केलं. चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवले नाहीत, चांगल्या लोकांना मदत केली नाही, आपल्या हिताचे काम करणाऱ्या कंपनी-उद्योगाचे शेअर्स आपण घेतले नाहीत. हे महापाप आपण केलं.

https://shetishala.blogspot.com/p/kadegaon-taluka-farmers-producer.html
अधिक माहितीसाठी वरील इमेज वरती क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० ला संपर्क करा.

पण ही आपली परिस्थिती बदलली पाहिजे. यासाठी सर्व ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. आपला विकास करायचाय, आपणही समृद्ध व्हायचाय; तर आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी प्रक्रिया, उत्पादन, विपणन अशी कामे सामूहिकरीत्या करणे गरजेचे आहे, तरच शेतकरू समृद्ध आणि सक्षम होईल. आणि म्हणूनच सक्षम- समृद्ध शेतकरी बनण्याची सुवर्णसंधी आपल्याला कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. देत आहे. होय, ही शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी तुम्हाला लाचारी आणि बेरोजगारीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्थापन झाली आहे. ' शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण ' हे ब्रीद ठेऊन कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कार्य करीत आहे. आपल्या जिल्ह्यात-तालुक्यात ऊस आणि दूध ही दोन उत्पादने घेतली जातात. प्रत्येक वर्षी आपल्या उसाला आणि दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलने आणि राजकारणही होते. परंतु आपणच एकत्र येऊन आपला प्रक्रिया उद्योग स्थापन केला तर आपणच स्वतः आपल्या उसाचा आणि दुधाचा हमीभाव ठरवू. आणि कोणतेही आंदोलन, राजकारण न करता आपले अधिकार आपल्याला मिळतील. ना कोणाची लाचारी, ना कोणाची मनधरणी. स्वतः शेतकरी मालक आणि शेतकरीचं चालक. अशी रचना कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची आहे. पारंपारीक पद्धतीने साखर, गुळ उत्पादन करण्यापेक्षा ब्राझीलच्या ऊस प्रक्रिया उद्योगावर आधारित नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी असणारे उसाचे इतर आधुनिक खाद्यपदार्थ बनविले तर आपल्या उसाला अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळू शकतो. याचा अभ्यास करून आम्ही आधुनिक पद्धतीने उसापासून खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग उभारण्याचे ठरविले आहे. दुधाचेही तसेच आहे. ग्रामीण बाजारात दुधापासून बनविलेले दर्जेदार आणि नवीन उपपदार्थ निर्मिती आणि विक्री करून दूध उत्पादक शेतकरी, कंपनीचे सभासद सक्षम करणे हाच प्रमुख उद्देश कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा आहे.

केंद्र शासन, राज्य शासन, कृषी विभाग आणि सर्व यंत्रणा ह्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवनवीन योजना आणतात खऱ्या पण प्रशासकीय अनास्था, राजकीय दबाव यामुळे त्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाहीत. यापुढचे शेतकरी कृषी धोरण हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सर्व शेतकरी हिताच्या शासकीय आणि खाजगी योजना शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळवून देणे असे आहे. त्याचबरोबर शेतकरी सक्षमीकरण हेच ध्येय कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे असल्याने प्रशासन आणि कामगार भरतीमध्ये शेतकरी सभासद यांना व त्यांच्या कुटुंबियांनाच संधी दिली जाणार आहे. याशिवाय कंपनी कायदे आणि सेबी यांच्या अधीन राहून प्रतिवर्षी डिव्हिडंड तसेच बोनस वाटप हे अनिवार्यपणे केले जाणार आहे. यासाठी शासनाची कडक नियमावली आहे. पण या सुविधांचा लाभ घेणेसाठी आपण कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सभासद असला पाहिजे.

आता निवड तुमची आहे. परिवर्तन आणि विकासाच्या लाटेत सहभागी व्हायचयं का परत तीच चूक करून लाचार आणि षंढ राहायचं. सक्षम व्हायचं का पुन्हा गरिबीत दिवस काढायचे. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करायची का पुन्हा अठरा विश्व दारिद्र्य पांघरून झोपायचं. निवड तुमची आहे.
The Choice Is Yours.
आपलाच,
प्रमोद महादेव मांडवे
चेअरमन, कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.


शेअर्स : सर्व इच्छुक शेतकरी व नागरिक आणि बंधू भगिनींनो आपल्या कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स खालीलप्रमाणे दिले जात आहेत. कंपनीचा एक शेअर १०००/-रुपये या दर्शनी किंमतीचा असून सभासदांना किमान १ शेअर घ्यावे लागतील. त्याची किंमत १,०००/- रुपये एक हजार फक्त. तसेच प्रवेश फी १००/- रुपये शंभर फक्त. असे एकूण ११,००/- रुपये अकराशे फक्त आहे. सदर रक्कम चेक, डीडी, NEFT, इंटरनेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करावी. पारदर्शकता असावी यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470, 9890098265, 9960007383
CIN NO. U01400PN2018PTC179761
PAN NO. AAHCK3348P
TAN NO. KLPK03069D
#Kadegaon Taluka Farmers Producer Co. Ltd.


Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments