Recents in Beach

For More Details Call On 9673371785

कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी : शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण

कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी : शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण 


नमस्कार, सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी. कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. या कंपनीची नोंदणी कंपनी निबंधक येथे झाली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करणेसाठी आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून आम्ही ' कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.' या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने आपल्या कडेगांव तालुक्यात ऊस आणि दूध हे मुख्य शेती आणि शेतीपूरक उत्पादन उद्योग असून या ठिकाणी शेतकऱ्यांचे सर्व जीवनमान हे ऊस आणि दूध उत्पादन या व्यवसायावर अवलंबून आहे. ऊस हे नगदी पीक तसेच दूध हे शेतीपूरक नगदी नफा मिळवून देणारे उत्पादन आहे. याचे उत्पादन जेवढे जास्त आहे; तेवढीच मागणी देखील आहे. त्याचबरोबर या ऊस आणि दूध आदी कच्या मालावर प्रक्रिया करून अनेक पदार्थांची निर्मिती होते. ज्याची मागणीसुद्ध खूप आहे. परंतु भांडवलशाही, राजकीय अनास्था, धोरणे आणि नियोजनाचा अभाव, सहकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील शेतकरी विरोधी नियमावली आदींमुळे शेतकरी अधिकाधिक अडचणीत येऊन शेतकरी आर्थिक आणि सामाजिक कमकुवत होत आहे. ऊस आणि दूध यावर प्रक्रिया उद्योग हे राजकारणी आणि मोठे भांडवलदार यांचे आहेत. त्यामुळे या उद्योगाच्या प्रगतीत राजकारण आडवे येऊन शेतकरी आणि उत्पादक यांचे अतोनात नुकसान होत आहे. परंतु शेतकरी हा स्वतः प्रक्रिया उद्योग उभारू शकत नसल्याने पुन्हा या मंडळींची लाचारी शेतकऱ्यांना नाईलाजाने करावी लागत आहे.

Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited Taste It Sugarcane Juice
अधिक माहितीसाठी संपर्क करा : ८९७५३०७४७०, ९८९००९८२६५ 

यासाठी शेतकरी, उत्पादक यांची भागीदारी असणार ऊस आणि दूध प्रक्रिया उद्योग सुरू होणे गरजेचे आहे. त्यानुसार शासकीय धोरणे बदलून सहकार कायदा अस्तित्वात आला देखील परंतु यातील सक्षम नियंत्रण यंत्रणा व कायद्यातील पळवाटा यांच्या अभावामुळे मालक/ शेतकरी हा फक्त नावापुरता उरून राजकारणी व व्यवस्थापनातील व्यक्ती याचा आर्थिक आणि सामाजिक लाभ उठवून सक्षम झाल्या व शेतकरी कमजोर झाला. याउलट सार्वजनिक संस्थांमध्ये सक्षम नियंत्रण यंत्रणा आहे परंतु गुंतवणूक आणि नफा वाटप आदींमध्ये ज्याचा जास्त हिस्सा त्याला जास्तीत-जास्त शक्ती अशी व्यवस्था असल्याने पुन्हा एकदा हिस्सेदार शेतकरी असह्य होत आहे आणि त्याची पिळवणूक चालूच आहे. यासाठी नवीन पर्याय आणि कायदे अस्तित्वात येणे गरजेचे होते. त्यानुसार शेतकरी उत्पादक कंपनी हा कायदा अस्तित्वात आला. यामध्ये सक्षम नियंत्रण यंत्रणा, शेतकरी मालकी आणि शेतकरी हितार्थ कडक कायदे आणि सुयोग्य अमलबाजवणी आदींचा संगम साधून उत्पादक शेतकरी यांची कंपनी स्थापना करणे व शेती प्रक्रिया उद्योग स्थापन करणे असा उद्देश आहे.
Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited Call : 8975307470
For More Information Call On 8975307470, 9890098265

' कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ' ही शेतकऱ्यांची नोंदणीकृत उत्पादक कंपनी आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक सक्षम करणे हा मुख्य उद्देश कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊस आणि दूध उत्पादनाला हमीभाव मिळवून देणे तसेच प्रक्रिया, विपणन आणि व्यवस्थापन यामध्ये शेतकऱ्यांना संधी देण्याचे तत्व कंपनी नियमांत आहे. पारंपारिक पद्धतीने उसापासून साखर, गुळ तसेच दुधापासून पारंपरिक लस्सी, श्रीखंड असे पदार्थ निर्मितीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उपपदार्थ निर्मिती करणे ज्याची किंमत आणि मागणी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय बाजारात जास्त आहे हे धोरण उराशी बाळगून कंपनी कार्य करीत आहे. या कंपनीचा मुख्य उद्देश हा शेतकरी सक्षमीकरण असल्याने यामध्ये प्रशासन आणि कामगार भरतीमध्ये शेतकरी सभासद यांना व त्यांच्या कुटुंबियांनाच संधी दिली जाणार आहे. याशिवाय कंपनी कायदे आणि सेबी यांच्या अधीन राहून प्रतिवर्षी डिव्हिडंड तसेच बोनस वाटप हे अनिवार्यपणे केले जाणार आहे. यासाठी शासनाची कडक नियमावली आहे.

शिवशक्तीच्या सर्व उपक्रमांना आपण सर्वोतोपरी सहकार्य केले आहे, दाद दिली आहे. आपला विश्वास आणि सहकार्य यावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे ध्येय पुढे नेण्यासाठी आणि आपल्या सहकार्याला बांधील राहून आपल्या ऋण आणि प्रेमातून उतराई होण्यासाठी तसेच उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हाताला रोजगार मिळावा व ऊस आणि दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यांना योग्य भाव व आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे आणि उद्योजकता वाढीस लागून शेतकरी आणि जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रमुख उद्देश ' कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. स्थापन करताना ठेवला आहे.

ऊस आणि दूध प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी खूप भांडवलाची आवश्यकता आहे. परंतु शासकीय योजना आणि शेतकरी उत्पादक कंपनी सक्षमीकरण धोरणामुळे प्रक्रिया उद्योग स्थापन करणे सोपे झाले आहे. यासाठी शासन स्वतः हुंत्व्णूक करीत आहे. शेतकरी हितार्थ उत्पादक शेतकरी यांना कंपनीच्या माध्यमातून विविध सवलती आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना शासन राबवित आहे. अट फक्त हीच आहे की तो शेतकरी हा शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद असावा. शेतकरी उत्पादक कंपनी संदर्भात शासकीय योजनांचा लाभ घेणेसाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद असणे बंधनकारक आहे. या योजनांचा लाभ आपणास मिळवून देणेसाठी आम्ही ' कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.' या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. आपणास आव्हान आहे की, आपण आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक सामजिक प्रगतीसाठी, परिवर्तन आणि नवनिर्मितीसाठी, लाचारी आणि बेरोजगारीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ' कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.' या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स घेऊन सभासद व्हावे आणि आपला सर्वांगीण विकास साधावा.

आपलाच,
प्रमोद महादेव मांडवे
चेअरमन, कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.


शेअर्स : सर्व इच्छुक शेतकरी व नागरिक आणि बंधू भगिनींनो आपल्या कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स खालीलप्रमाणे दिले जात आहेत. कंपनीचा एक शेअर १०००/-रुपये या दर्शनी किंमतीचा असून सभासदांना किमान १शेअर घ्यावे लागतील त्याची किंमत १,०००/- रुपये एक हजार फक्त तसेच प्रवेश फी १००/- रुपये शंभर फक्त असे एकूण ११,००/- रुपये अकराशे फक्त आहे. सदर रक्कम चेक, डीडी, NEFT, इंटरनेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करावी. पारदर्शकता असावी यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470, 9673371785, 9890098265, 9960007383
CIN NO. : U01400PN2018PTC179761
PAN NO. : AAHCK3348P
TAN NO. : KLPK03069D
#Kadegaon Taluka Farmers Producer Co. Ltd.



Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments