Recents in Beach

For More Details Call On 9673371785

#शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण

#शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण 
Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited


कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे शेअर्स घेऊन सभासद व्हा आणि स्वतःच्या, शेतकऱ्यांच्या व भारताच्या विकासात सहभागी व्हा.

                           कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी असून शेतकऱ्यांना शासकीय व खाजगी योजनांचा लाभ मिळवून देणे व शेतकऱ्यांच्या कच्या मालावर प्रक्रिया करून विविध पदार्थ निर्मिती व त्याची विक्री करून जास्तीत जास्त नफा उत्पादक शेतकरी यांना मिळवून देणे असे ध्येय ठेऊन शेतकरी सक्षमीकरणासाठी व भारत देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे.


                    शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी आणि आत्महत्या यावर उपाय हा फक्त संघटित होऊन शेती उद्योग हा व्यावसायिक पद्धतीने करून जास्त नफा मिळवणे हाच आहे. भांडवलशाही, राजकीय अनास्था, संकुचित वृत्ती आणि शेतीकडे फक्त उदरनिर्वाहाचे साधन एवढेच पाहणे ही वृत्ती शेती क्षेत्राला कनिष्ठ स्तरावर नेऊन ठेवत आहे. शेतकरी एकत्र आल्यास छोटे-मोठे सामूहिक प्रक्रिया उद्योग स्थापन होऊन शेतीला कॉर्पोरेट लूक येईल व जास्तीत जास्त नफा शेतकऱ्यांना मिळेल. आत्ताच्या काळात शेतीचा नफा हा दलाल आणि व्यापारी यांच्यात जात आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती व प्रक्रिया उद्योग स्थापन करून स्वतःच सर्व कार्ये जसे प्रक्रियेपासून विक्री व विपणन केल्यास दलाल आणि व्यापारी यांच्याकडे जाणार नफा थेट शेतकऱ्यांना मिळेल.
                       
अधिक माहितीसाठी संपर्क इमेजवर क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०, ९८९००९८२६५ 
यासाठीच शेतकरी सक्षमीकरण हेच धोरण ठेऊन कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ऊस व दुग्ध प्रक्रिया उद्योग उभा करीत आहे. यामध्ये उसापासून प्रचलित पद्धतीने रेडी टू इट खाद्यपदार्थ निर्मिती होणार आहे त्याची मागणी व किंमत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय बाजारात जास्त मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना आपल्या ऊस आणि दूध उत्पादनासाठी करावी लागणारी लाचारी आणि हमीभाव, काटामारी या समस्या निवारण करणे हे कंपनीची मुख्य उद्दीष्ठ आहे. सदर प्रक्रिया प्रकल्पासाठी लागणारे भांडवल मिळणेसाठी शासकीय योजनांबरोबर सभासद शेतकरी यांना प्रक्रियेत सामावून घेणेसाठी कंपनीने १००० शेअर्स विक्रीसाठी काढले आहेत. कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही संपूर्ण शेतकऱ्यांची मालकी असणारी शेतकरी उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे कंपनीचे सर्व व्यवहार हे पारदर्शक व स्पष्ट आहेत.
शेतकरी वर्गाची विविध ठिकाणी फसवणूक झाली आहे त्यामुळे शेतकरी प्रत्येक पाऊल सावध टाकत आहे हे आम्ही जाणतो आहे. आणि हे चुकीचेही नाही हे आम्हाला माहिती आहे. यासाठीच कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही आपली ध्येय धोरणे, कायदेशीर बाबी, उतापदकांचे अधिकार, व्यवस्थापकीय कर्तव्ये आदींचा खुलासा स्वतःच करत आहे. एवढी पारदर्शकात कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दाखवत आहे. एकूणच काय ' शेतकरी सक्षमीकरण ' हे ध्येय ठेऊन आपण वाटचाल करत असल्याने शेतकरी वर्गाने स्वतःची गुंतवणूक आणि भविष्यकालीन संकटे आदींचा नकारात्मक विचार न करता सकारात्मक असे फायदे आणि भविष्यकालीन योजना आदींचा विचार करून शेतकरी सक्षमीकरण आणि परिवर्तनाच्या चळवळीत कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे शेअर्स घेऊन सहभागी व्हावे व भारताला आणी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे ही नम्र विनंती.
#शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण

                                                                                                      आपलाच,
                                                                                              प्रमोद महादेव मांडवे
                                                                                  चेअरमन, कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.

शेअर्स विक्री सुरू आहे.
#शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण
#कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

सर्व इच्छुक शेतकरी व नागरिक आणि बंधू भगिनींनो आपल्या कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स खालीलप्रमाणे दिले जात आहेत. कंपनीचा एक शेअर १०००/- रुपये यादर्शनी किंमतीचा असून सभासदांना किमान १ शेअर घ्यावा लागेल. त्याची किंमत १,०००/- रुपये एक हजार फक्त. तसेच प्रवेश फी १००/- रुपये शंभर फक्त. असे एकूण ११,००/- रुपये अकराशे फक्त आहे. सदर रक्कम चेक, डीडी, NEFT, इंटरनेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करावी. पारदर्शकता असावी यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
शेअर खरेदी करण्यासाठी बँक डिटेल्स पुढीलप्रमाणे :
Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited.
Bank of Maharashtra Branch - Kadegaon A/C- 60317650012
ISFC Code - MAHB0001636

अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470, 9890098265, 9960007383
CIN NO. U01400PN2018PTC179761
PAN NO. AAHCK3348P
TAN NO. KLPK03069D
#Kadegaon Taluka Farmers Producer Co. Ltd.
#शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण




Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments