Recents in Beach

For More Details Call On 9673371785

करार शेतीतून सक्षम केलेला मशरूम व्यवसाय

नाशिक स्थित किरण व चेतना या पवार दांपत्य २३ वर्षांपासून अळिंबी (मशरूम) उद्योगात कार्यरत आहे. अनेक आव्हानांशी सामना करताना मेहनत, सातत्य, संशोधन, बाजारपेठांचा अभ्यास, विक्री कौशल्यातून पुढे जात व्यवसायाचा विस्तार केला. सध्या राज्य-परराज्यातील सुमारे ८० व्यावसायिकांना स्पॉन (मशरूम बीज) पुरवून मशरूमची करार शेती ते करताहेत. जोडीला प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या निर्मितीलाही चालना दिली आहे.
www.shetisalla.com


मूळचे नगर जिल्ह्यातील लोणी (ता.राहाता) येथील किरण पवार नाशिक येथे वास्तव्यास आहेत. रासायनिक अभियांत्रिकी शाखेची पदविका पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता अळिंबी (मशरूम) उद्योगाची त्यांनी निवड केली. कुटुंबाचा विरोध झाला. खिशात भांडवल नव्हते. तरीही जिद्द व धडपड होती. दरम्यान मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण पूर्ण केले. आई तसेच मामांकडून १५ हजार भांडवल उभे केले. पुढे १९९८ मध्ये मालकीच्या जागेत कमी खर्चात टाकाऊ घटकांपासून शेड उभे केले. तेथून १२ किलो दैनंदिन उत्पादन सुरू करून स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात केली. धिंगरी अळिंबीवर (ऑयस्टर) पवार मुख्यत्वे काम करतात.
सुरुवातीचे टप्पे
उत्पादन सुरू झाल्यानंतर स्थानिक बाजारात मागणी नव्हती. त्यामुळे अडचणी अजूनच वाढल्या.\ मात्र पवार दांपत्याने ग्राहकांना मशरूमचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यास सुरुवात केली. मशरूमच्या विविध पाककृती बनवून ग्राहकांचे नेटवर्क तयार केले. सिद्धार्थ मशरूम नावाने ब्रँडिंग करत व्यवसायाला ओळख दिली. 'www.siddharthmushroom.com असे संकेतस्थळ विकसित केले. सुरुवातीला ८० टक्के विक्री स्थानिक तर २० टक्के बाहेरगावी होती.
स्पॉन(मशरूम बीज)उत्पादनाला सुरुवात
ग्राहक जोडले गेले अन् मागणी वाढत गेली. मात्र उत्पादन क्षमता जास्त असूनही स्पॉनअभावी पूर्ण क्षमतेने उत्पादन होत नव्हते. त्यावेळी पुणे येथून अधिक खर्च करून स्पॉन उपलब्ध व्हायचे. यावर मात करण्यासाठी १९९९ मध्ये स्पॉन उत्पादन सुरू केले. त्यामध्ये यांत्रिकीकरण केले. परिसरातील उत्पादकांनाही पुरवठा सुरू केला.सन २००३ मध्ये आत्मा, नगर यांच्या मार्गदर्शनाखाली २० सदस्यांचा जिल्हा मशरूम उत्पादक संघ स्थापन केला. त्यांच्यासोबत करार पद्धतीने काम सुरू केले.
उभारले ग्राहकांचे जाळे
  • करार पद्धतीने महिन्याला १० क्विंटल मशरूम तयार व्हायचे.
  • ताज्या मशरूमची मागणी कमी असल्याने वाळलेल्या धिंगरी मशरूम विक्रीस सुरुवात
  • अन्न प्रक्रिया उद्योग, शिर्डी, गुजरात, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक राज्यात मागणीनुसार पुरवठा
  • मागणीत वाढ झाल्याने अन्य व्यावसायिकांकडून खरेदी करून राज्याबाहेर विक्री
  • सन २००८ पर्यंत वाळलेल्या मशरूमची भारतात ३० टन वार्षिक उच्चांकी विक्री
  • व्यवसायातील मागणी, बदललेल्या संधी विचारात घेत कालानुरूप त्यात बदल

सध्याची करार शेती
  • नगर जिल्ह्यातून नाशिकमध्ये व्यवसाय सुरू झाल्यानंतर स्पॉनची मागणी वाढत गेली.
  • उत्पादन क्षमता वाढविली. सोबत कुशल मनुष्यबळ उभे केले.
  • या माध्यमातून धिंगरीसह बटण, मिल्की व पॅडी स्ट्रॉ, तसेच परदेशी प्रकारात 'शिताके' मशरूम व औषधनिर्मितीसाठी आवश्यक मशरूम बियाणे उत्पादन व विक्री
  • यातून अनेक घटक जोडले गेल्याने करार पध्दतीच्या व्यवसायाला अजून मोठा वाव मिळाला.
  • सध्या राज्य व परराज्यासह ८० अळिंबी उत्पादकांसोबत करार पद्धतीने शेती
  • त्यांना स्पॉनचा पुरवठा व त्यांच्याकडून मशरूमची खरेदी
  • हाताळणी,प्रतवारी व पॅकिंग करू विक्री
  • प्रति महिना स्पॉन विक्रीक्षमता- १० टन
  • दर प्रतिकिलो ८० रुपये
  • जनसंपर्क व संवाद कौशल्याचा वापर करून मार्केटिंग
  • लोणीसह शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, औरंगाबाद, पुणे, सुरत आदी ठिकाणी विक्री
  • मुंबई येथील व्यापारी, विमानसेवा, पंचतारांकित हॉटेल्ससाठीही पुरवठा
  • अलीकडे कुसगाव( जि.पुणे) येथे ३५ किलो प्रतिदिन मशरूम उत्पादन क्षमता असलेले युनिट भागीदारीतून उभारले आहे.
  • उच्च दर्जाच्या मशरूम निर्मितीसह विक्री साखळी मजबूत करून तंत्रज्ञान विस्तारास चालना
आदिवासी भागात मशरूम उत्पादन
करार पद्धतीने उत्पादकांचे नेटवर्क तयार करताना प्रामुख्याने इगतपुरी, सुरगाणा,पेठ, अकोले, नवापूर, तळोदा या तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण दिले. त्यांना कमी खर्चात उत्पादन साहित्य व कमी दराने स्पॉन पुरवठा करून उत्पादित मशरूम रास्त दराने खरेदी करण्यात येते. गुजरात व मध्यप्रदेश येथील आदिवासी भागात २००७ ते २००९ दरम्यान प्राधान्याने आदिवासी भागात काम उभे केले.
प्रक्रियायुक्त उत्पादनांचे मार्केटिंग
मशरूमपासून विविध प्रक्रियायुक्त उत्पादने करण्याचेही पवार दांपत्याने ठरवले. केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन केंद्र (सीएफटीआरआय), म्हैसूर येथे संबंधित प्रशिक्षण घेतले. त्यानंतर चेतना यांनी मशरूम रोल, समोसा, सूप, मशरूम पुलाव हे पदार्थ तयार केले. मशरूम बिस्कीट, पापड, वडी, वाळवण, नूडल्स असे पदार्थ मागणीनुसार विक्रीसाठी आणले. त्यांची मागणी वाढत आहे.
आदर्श कार्यपद्धती
  • तांत्रिक निकषांचा अवलंब करून स्पॉन व अळिंबीचे गुणवत्तापूर्ण उत्पादन
  • गेल्या २० वर्षांत देशभर ग्राहक संख्या वाढवली. मार्केटिंग प्रभावी केले.
  • नाशिक, मुंबई, दिल्ली, पुणे, नागपूर आदी ठिकाणी प्रदर्शनात सहभागी
कार्याचा सन्मान
  • गुणवत्तापूर्ण उत्पादन व विक्री व्यवस्था यातील कामासाठी २००९ मध्ये मशरूम संशोधन महासंचालनालय, सोलन (हिमाचल प्रदेश) यांच्यातर्फे राष्ट्रीय मशरूम उत्पादकता पुरस्कार
  • ‘मशरूम सोसायटी ऑफ इंडिया’या संस्थेचे पश्चिम-मध्य भारत विभागाचे समन्वयक. आजीवन सभासदत्व
  • राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे,व्यवसाय मार्गदर्शक संस्थामध्ये मार्गदर्शक
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये सहभाग
संपर्क- किरण पवार, ९८६००९७६३६
चेतना पवार, ९८५०१०८४१

Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments