Recents in Beach

For More Details Call On 9673371785

अवर्षणात मिनी डाळ मिलने दिला आर्थिक उत्पन्नाचा आधार

सातत्याने अवर्षणग्रस्त असलेल्या भागात शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाचा आधार म्हणून मिनी डाळ मिलचा पर्याय औरंगाबाद येथील कृषी विज्ञान मंडळाने एका प्रकल्पांतर्गत शेकटा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केला. त्यातून उत्पन्नाचा स्त्रोत तयार होण्याबरोबर रोजगारनिर्मिती झाली. गावातील शेतकऱ्यांना आपल्या कडधान्यांपासून वाजवी दरांत डाळ बनवून घेण्याची सोय झाली. उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सार्वजनिक गरजांची कामेही करण्याचा प्रयत्न या निमित्ताने शेतकरी गटाने केला.
औरंगाबाद जिल्ह्याच्या पश्चिमी भागाला कायम अवर्षणाचा सामना करावा लागतो. याच भागात येणाऱ्या गंगापूर तालुक्यातील शेकटा गाव त्यापैकीच एक. गेल्या अनेक दशकांपासून या गावासह आसपासची गाव दुष्काळी राहिली आहेत. कापूस हे या भागातले मुख्य पीक. सरासरी पावसाचा विचार करता सुमारे ६४४ मिलिमीटर पाऊस पडतो. गावात गेल्या दहा वर्षापासून सरासरीपेक्षाही निम्मा व काही वेळा त्यापेक्षाही कमी पाऊस राहिला आहे. पावसाचा लहरीपणा, पावसाचा खंड, एकाच वेळी जास्त पाऊस पडणे यामुळे भागातील शेती दिवसेंदिवस जोखमीची होत चालली. यावर उपाय योजण्यासाठी शेकटाचे ग्रामस्थ विचार करीत होते.

www.shetisalla.com

निकरा प्रकल्पात निवड
हवामान बदलावर आधारित कृषी प्रकल्पात (निकरा) शेकटा गावाची २०१२ मध्ये निवड झाली. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला. हैदराबाद येथील कोरडवाहू संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनात शेकटासह परिसरातील शेतीशिवाराचा अभ्यास उपाययोजना सुरू केल्या. विविध उपक्रमांचा समावेश करून ते प्रत्यक्ष शेतावर राबविणे सुरू केले.
ग्राम जोखीम व्यवस्थापन समिती
प्रकल्पाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी गावकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून राष्ट्रीय कृषी प्रकल्पांतर्गत शेकटा येथे ग्रामीण हवामान जोखीम व्यवस्थापन समिती स्थापन केली. समितीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जाधव, सचिवपदी अजिज शेख, कोषाध्यक्षपदी जिलानी शब्बीर शेख तर सदस्य म्हणून योगेश जाधव, पोपट गायकवाड, भगवान राजपूत, रईस याकुब खा पठाण, संतोष जाधव यांची निवड करण्यात आली. केवळ उपायांपुरते मर्यादित न राहता गावात वाजवी दरात भाडेतत्वावर देण्यासाठी अवजारे केंद्र स्थापन करण्यात आले.
डाळमिलची संकल्पना प्रत्यक्षात
  • या केंद्राच्या माध्यमातूनच मिनी डाळमिलची उभारणी २०१७ मध्ये करण्यात आली. त्यातून गावातील तीन ते चार लोकांना रोजगार व अन्य गावकऱ्यांना आपल्या तूर, हरभरा, उडीद, मूग यांच्या आधीपासून सुरू असलेल्या घरगुती डाळ निर्मितीला थोडे व्यावसायिक रूप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत आधार देण्याचा हा प्रयत्न होता.
  • डाळमिल उभारणीनंतर केव्हीके, औरंगाबाद यांच्या सहकार्यातून संबंधित विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम झाला. हवामान जोखीम समितीचे सदस्य संतोष जाधव यांनी त्याचा लाभ घेतला. समितीचे या मिनी डाळमिल उद्योगावर नियंत्रण आहे. बिघाड दुरुस्ती व मजुरी खर्च वजा जाता जी रक्कम उरते ती जोखीम व्यवस्थापन समितीकडे जाते. त्याचा उपयोग गावातील सार्वजनिक गरजांसाठी होतो.
डाळमिल उद्योग दृष्टीक्षेपात
  • एक क्विंटल तुरीला आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर आकारले जातात. त्यापेक्षा कमी डाळीसाठी एकहजार रु. दर
  • एक क्विंटल तूर, हरभरा, मूग, उडीदपासून ७० किलो डाळ मिळते.
  • डाळ तयार करण्यासाठी एक किलो मोहरी तेलाचा वापर
  • डाळ निर्मितीसाठी सरासरी ४६५ रुपये प्रति क्विंटल खर्च
पहिल्या वर्षी थेट विक्रीचा प्रयत्न
  • पहिल्या वर्षी संतोष जाधव, कय्युम शेख व ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्याकडील अनुक्रमे तूर, मूग व हरभऱ्याची डाळ तयार करून थेट विक्री केली. यंदाही जाधव यांनी दोन क्विंटल तुरीची डाळ करून त्यापैकी ५० किलो विक्री केली. परिसरातील सायगाव, वडाळी, वजनापूर, बोलठाण, खोपेश्वर, तांदुळवाडी, मालुंजा, बुट्टेवाडगाव, शिल्लेगाव आदी गावातील लोकही शेकटा येथील या डाळमिल उद्योगातूनच डाळ तयार करून घेतात.
  • संतोष यांनी सोबत पिठाची गिरणीही सुरू केली आहे. गावातील तसेच प्रसंगानुरूप वीज पुरवठा खंडित झाल्यास गावकऱ्यांना ते त्याची सुविधा उपलब्ध करून देतात. दिवसाला किमान तीनशे ते चारशे रुपये उत्पन्न त्यातून मिळतात. त्यातून कुटूंबाच्या अर्थकारणाला हातभार लागतो. केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे वेळोवेळी प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्यावर उपाय सुचविण्याचे काम सातत्याने करीत आहेत.
अर्थकारण (प्रातिनिधिक)
वर्ष २०१८-१९ प्रकार डाळ निर्मिती (क्विं.)
तूर १.२
मूग ०.६०
उडीद ०.५०

वर्ष २०१९-२० प्रकार डाळ निर्मिती (क्विं.)
तूर २४
मूग
उडीद
हरभरा
.


प्रतिक्रिया
दुष्काळात कडधान्यांची शेती व डाळनिर्मिती हा सक्षम पर्याय आहे. सध्या ४०० किलो डाळीची निर्मिती आम्ही दिवसाला करतो आहे. येत्या काळात ती वाढेल. डाळ निर्मितीत वाया काहीच जात नाही. शंभर किलो तुरीपासून ७० किलो डाळ तर तर तीस किलो कणी, भुसा वगैरे घटक मिळतात. त्याचा जनावरांना खाद्य म्हणून वापर होतो.
- संतोष जाधव, ९४०३२१४१४७, ७४९९७३५८२९
डाळमिल चालक,

डाळमिल व्यवसायातून गावातील तीन-चारजणांना किमान तीन महिने रोजगार मिळतो. ग्रामस्थांची सोय झाली. शिवाय उद्योगातील नफ्यातून
सार्वजनिक गरजेची कामे केली जातात.

- अण्णासाहेब जाधव
अध्यक्ष, हवामान जोखीम व्यवस्थापन समिती, शेकटा.

पहिल्या वर्षी तूर, मूग व उडीदाची जवळपास साडेपाच क्विंटल डाळ तयार करून थेट ग्राहकांना वाजवी दरात विक्री केली. यंदा घरी लागणाऱ्या डाळी याच डाळ मिलच्या माध्यमातून तयार करून घेतल्या.
- कय्युम शेख
प्रयोगशील शेतकरी, शेकटा

संपर्क- डॉ. किशोर झाडे-८२७५३८८०४९




www.shetisalla.com
For Service Inquiry Call : 9673371785

                 गाईवर झालेला वार्षिक खर्च आणि आलेले उत्पादन यातील फरक पाहावाप्रथम वेतात योग्य आणि परिपूर्ण आहार देऊनही गाईपासून ४५०० लिटर (सरासरी १५ लिटर/प्रति दिन ) उत्पादन  मिळाल्यास ती गाई विकून नवीन खरेदी करावी.
     सर्वात महत्वाचे जास्त दूध देणाऱ्या गाईपासून जास्तीत जास्त कालवडी कश्या मिळतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आणि विज्ञानामुळे हे शक्य झाले आहेत्यामुळे आपण गाई भरवताना डॉक्टरकडे SEXED SEMEN ची मागणी करावी.
         आपणास आवश्यक असणारे पशु खाद्य आणि इतर बाबी जसे कि खनिज मिश्रण इत्यादी शेतकरी गट तयार करून होलसेल दराने खरेदी करावेतसेच शेण वर्षभर साठवून  ठेवता त्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत बनवुन विक्री करावे किंवा स्वतःसाठी वापरावे. 


www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*

प्रगतिशील शेतकरीकृषितज्ञकृषी शास्त्रज्ञकृषी अधिकारीकृषी संस्थांचे पदाधिकारीकृषी क्षेत्रातील विद्यार्थी  शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहेप्रिंट मीडियाटीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहेसर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहेपण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहेआज प्रत्येक जण लेखक आहेप्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहेजगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञानसल्लाकृषीविषयक माहितीमहत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईलजगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहेशेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहेकृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.

आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथानाविन्यपूर्ण प्रयोगशेतीसल्लाउपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध कराकृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी  तज्ञांनी आपले लेखमाहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.



*मोफत जाहिरात आपली कृषी विषयक उत्पादने  सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकतापोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवाशेतीविषयक महत्वपूर्ण माहिती  मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने  सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहेत्वरा कराएका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जाआपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.



*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*

www.shetisalla.com नियम  अटी :

*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.

*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज  टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.

*लेख हे स्वतःचे असावेकॉपी नसावे.








Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments