Recents in Beach

For More Details Call On 9673371785

शेतीमधील ‘विमेन चॅम्पियन'




पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागातील वीस निवडक गावांमध्ये बाएफ आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त उपक्रमांमधून शेतीमध्ये ‘विमेन चॅम्पियन' तयार होत आहेत. वावरात काबाडकष्ट करणारी महिला शक्ती या प्रकल्पातून आधुनिक शेतीचे धडे घेवू लागली आहे.  
ग्रामीण भागातील महिलांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी बाएफ आणि महिंद्रा कंपनीच्या संयुक्त प्रयत्नातून ‘विमेन चॅम्पियन इन ॲग्रीकल्चर’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम आकार घेत आहे. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील मनेगाव, आटकवडे, पाटोळे, धोंडवीरनगर, देशवंडी, बारागाव पिंप्री या गावातील महिलांची निवड करण्यात आली आहे. बाएफ संस्थेला ‘विमेन चॅम्पियन' उपक्रमासाठी महिंद्रा कंपनीने सोळा गावांसाठी आणि फिनोलेक्स कंपनीने चार गावांसाठी निधी दिला आहे. उपक्रमातून गावातील निवडक महिलांना माती परीक्षण, बीजप्रक्रिया, जैविक रोग-कीड नियंत्रण, रासायनिक खतांचा एकात्मिक वापर, चारा निर्मिती व गांडूळ खत निर्मिती, आधुनिक शेती समजावून सांगण्यासाठी अभ्यासदौऱ्यांचे नियोजन केले आहे. आरोग्यविषयक शिबिर, पशुधन विकास कार्यक्रम राबविला जात आहे. गावपातळीवर दरमहा महिलांच्या शेतीशाळेमध्ये प्रत्यक्ष शेतात प्रशिक्षण दिले जाते.
उपक्रमाचे स्वरूप  
बाएफ आणि महिंद्राच्या प्रेरणा प्रकल्पाचे समन्वयक सुनील घुगे म्हणाले की, हा प्रकल्प आम्ही ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरू केला.  बाएफचे राज्य प्रमुख सुधीर वागळे, महिंद्रा कंपनीचे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर राजेश जेजुरीकर आणि प्रेरणा प्रकल्पाच्या एेश्वर्या रामकृष्णन यांच्या माध्यमातून  हा प्रकल्प आकाराला येत आहे. या उपक्रमात वीस गावांमधील २४८ शेतकरी महिला निवडलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात एक चॅम्पियन फार्मर महिला तयार केली जाईल. ती पुन्हा गावातील सात महिलांना आधुनिक शेती प्रशिक्षण देईल. या प्रकल्पातून आम्ही एक हजार महिलांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देत आहोत. बाएफ संस्थेने महिलांना शेतीमधील विविध तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ पुरविले आहे.
 शेतकरी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सुनील घुगे यांच्यासह महिंद्राचे सिनिअर कस्टमर केअर मॅनेजर सुशांत पाटील, उदय गोळेसर तसेच बाएफमधील दिगंबर चौधरी, निलेश भवर, विवेक देवरे, डॉ.एस.एम.गोपाळे  कार्यरत आहेत. महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर ‘फिल्ड गाईड' म्हणून शोभा भालेराव (मनेगाव), सुलोचना वाघ (आटकवडे), सुरेखा शिरसाठ (पाटोळे), सुनीता काळोखे (धोंडवीरनगर), लता सोनवणे (देशवंडी),ज्योती ताकाटे (बारागाव पिंप्री) यांच्याकडे जबाबदारी आहे.
ट्रॅक्टरचलित अवजारांचे प्रशिक्षण 
महिंद्राचे सिनिअर कस्टमर केअर मॅनेजर सुशांत पाटील म्हणाले की, शेती व्यवस्थेत अपघाताने जबाबदारी आली म्हणून ट्रॅक्टर चालविण्यास शिकणाऱ्या काही महिला आहेत. मात्र, प्रेरणा प्रकल्पात महिला स्वतःहून पुढे येऊन ट्रॅक्टर शिकत आहेत. पुढील टप्प्यात महिलांना ट्रॅक्टर तसेच अवजारे वापराबाबत मोफत प्रशिक्षण देत आहोत. मनेगावच्या ५२ वर्षांच्या मथुरा सोनवणे या काहीही शिकलेल्या नाहीत. मात्र, त्यांचे निरीक्षण आणि स्मरणशक्ती कमालीची तीव्र आहे. मणक्याचा विकार असूनही त्यांना या वयात ट्रॅक्टर शिकण्याची तीव्र इच्छा आहे. शेतीचे कोणतेही तंत्र सांगितल्यानंतर त्यांना पाठ होते. त्यानंतर तीच माहिती गावातील इतर शेतकरी महिलांना त्या सहजपणे देतात.
असा आहे प्रकल्प 
  • महिलांना शेती तंत्रज्ञानाची माहिती. यांत्रिकीकरणाची सुविधा. यातून पीक उत्पादन वाढीला मदत.
  • विविध गावांमध्ये एक हजार ‘विमेन चॅम्पियन' तयार होणार.
  • पूरक उद्योग, शेती व्यवस्थापनाला चालना.
पशुपालनाला चालना 
प्रकल्पात सहभागी झालेल्या विविध गावातील महिलांनी दुग्धव्यवसायाला चालना दिली आहे. पशू आहार व्यवस्थापन, आरोग्य विषयक जागृती केल्यामुळे गावांमध्ये किमान तीन हजार लिटर्स दूध उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे.  बाएफच्या कार्यक्रम समन्वयक आश्लेषा देव म्हणाल्या की, प्रेरणा प्रकल्पातून हजारो महिलांना शेतीमधील चॅम्पियन करण्याचा संकल्प आहे. महिलांना मिळणारा मान आणि वाढता आत्मविश्वास मोलाचा आहे. खेड्यातील महिलांनी ट्रॅक्टरचे स्टिअरिंग हातात घेतले, स्टेजवर ठामपणे बोलतात. मोठ्या कृषी प्रदर्शनांमध्ये माहिती घेतात, शास्त्रज्ञांना प्रश्न विचारतात. ही सर्व प्रक्रिया आमच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाची आहे.
अवजारे सेवा केंद्र 
प्रेरणा प्रकल्पात मनेगावमध्ये समता बचत गटाच्या माध्यमातून अवजारे सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्वयंचलित पेरणी यंत्र, तुषार सिंचन यंत्रणा, पॉवर विडर, पॉवर स्प्रेअर, सोलर ट्रॅप, सायकल विडर, सोयाबीन ग्रेडर अशी दोन लाखांची अवजारे केंद्रामध्ये आहेत. महिलांचे बचत गट आधुनिक शेती तंत्राची माहिती एकमेकांना देतात.
शेती नियोजनाची जबाबदारी 
  • मनेगावमधील रोहिणी सोनवणे यांच्याकडे स्वमालकीचा ट्रॅक्टर होता. त्यांना ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे शेतातील कामे त्या स्वतः करतात. 
  • नीशा सोनवणे यांचे पती व्यवसायानिमित्त बाहेर असल्यामुळे घरच्या आठ एकर शेतीचे नियोजन त्या स्वतः करतात. त्यांनी ट्रॅक्टरचलित अवजारे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रेरणा प्रकल्पामधून त्यांना आधुनिक शेतीचे धडे मिळाल्याने त्यांनी किफायतशीर शेती सुरू केली. मक्यात कोथिंबिरीचे आंतरपीक घेऊन वीस हजाराचे अतिरिक्त उत्पन्न मिळविले. 
  • बारागाव पिंप्रीतील ज्योती ताकाटे यांची तीन एकर शेती आहे. प्रशिक्षणामुळे ताकाटे यांनी दोडक्यामध्ये डांगराचे आंतरपीक घेत २३ हजारांचा निव्वळ नफा मिळवला.
  • मनेगावच्या वंदना बाजूनाथ सोनवणे यांच्या माहेरी शेती नव्हती. सासरी आल्यावर त्यांना साडेचार एकर शेती मिळाली. मात्र, पती इलेक्ट्रिक व्यावसायिक असल्याने शेती फारशी पहात नाहीत. यामुळे वंदनाताईंना शेती नियोजनाची संधी मिळाली. प्रकल्पामध्ये त्यांनी गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन   तीन टन गांडूळ खत तयार केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत ३० शेतकरी महिलांनी गांडूळखत निर्मितीस  सुरुवात केली आहे. वंदनाताई आता ट्रॅक्टर देखील चालवतात.
     
महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम
महिंद्राचे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर राजेश जेजुरीकर म्हणाले की, प्रेरणा प्रकल्प एक आशादायक सुरुवात आहे. महिला कुटुंबाचा भार वाहत शेतीला आधार देतात.  प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशिक्षण, अवजारांची ओळख आणि शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. त्यामुळे पीक उत्पादन वाढले आहे. बायफचे राज्य प्रमुख सुधीर वागळे म्हणाले की, जास्तीत जास्त महिलांना या प्रकल्पापासून प्रेरणा मिळावी अशी धडपड आहे. आम्ही महिलांना नेतृत्व करण्यास सांगत आहोत. निवडक गावांमध्ये शेतीमधील महिलांच्या सबलीकरणाचे काम अतिशय ताकदीने सुरू आहे.

एकीचे बळ, मिळते फळ 
  • विविध गावांमध्ये महिला बचत गटांची उभारणी. आर्थिक व्यवहारात सक्षमता.
  • ट्रॅक्टर,आधुनिक अवजारांच्या प्रशिक्षणासह शेतीमध्ये वापर.
  • खते,बियाणे,कीडनाशकांच्या योग्य वापराकडे कल.
  • व्हॉटस् ॲप ग्रुपमधून तांत्रिक माहितीचा प्रसार.
  • शेती विकासामध्ये महिलांचा पुढाकार.
 -सुनील घुगे,९४०५९६५६५४
(समन्वयक,प्रेरणा प्रकल्प,बाएफ)
 - सुशांत पाटील,९८८११३५९४१
(मॅनेजर, सिनिअर कस्टमर केअर,महिंद्रा)




@yoursuperquotes ##motivationalquotes ##attitudequotes ##hindiquotes ##chetansawant ##moviequotes ##tiktokquotes @pramodmandave11
♬ original sound - yoursuperquotes
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments