कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा काळात हरितगृह, शेडनेटमधील पिकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.
- सध्या तापमान वाढीच्या परिस्थितीमध्ये हरितगृहाचे कर्टन दिवसभर उघडे ठेवावेत. शेडनेट सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पसरून ठेवावे,त्यानंतर उघडावे.
- वाढत्या तापमानाच्या काळात सकाळी आणि सायंकाळी वाफसा स्थिती राहील या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
- गादीवाफ्याच्या कडा सकाळी ओल्या करून घ्याव्यात. शक्य असेल तर दोन्ही गादीवाफ्याच्यामधील भागामध्ये पाणी भरून ठेवावे.
- हरितगृह, शेडनेटचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्री २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे. तसेच आद्रता ६० टक्के ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- वाढत्या तापमानाच्या परिस्थितीमध्ये पिकांची अन्नद्रव्यांची गरज कमी आणि पाण्याची गरज जास्त प्रमाणात असते. यासाठी खतमात्रा निम्मी करून जिवाणू स्लरीचा वापर वाढवावा. म्हणजे स्थिर झालेली अन्नद्रव्ये पिकाला मिळतील.
- नवीन भाजीपाला लागवडीसाठी जमीन तापू द्यावी. मातीमध्ये कुजलेले शेणखत मिसळावे. यामध्ये तागाची लागवड करून फुलोऱ्यात असताना गाडावा.
- जुने प्लॉट संपले असतील तर या ठिकाणी नेट उघडी ठेवून नांगरट करून माती तापवून घ्यावी. म्हणजे नैसर्गिकरित्या मातीचे निर्जंतुकीकरण होते.
- लागवड असलेल्या पिकाच्या क्षेत्राच्या मातीमध्ये क्षार वाढले असतील तर बेड रेकिंग /कुदळणी करून जिवाणू खतांचा वापर वाढवावा.
- नवीन पीक लागवडी अगोदर पाणी आणि मातीचे परीक्षण करून घ्यावे.त्यानंतर शिफारशीनुसार खत मात्रा देण्याचे नियोजन करावे.
- भाजीपाला पिकामध्ये विशेषतः रंगीत ढोबळी मिरचीची लहान फळे वेडीवाकडी आलेली असतील किंवा कीड, रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झाली असतील तर काढून घ्यावीत.
- रंगीत ढोबळी मिरची हिरवी असताना तोडून मागणीनुसार विक्री करावी.
- झाडावर फळांचा जास्त भार ठेवू नये, टप्याटप्याने काढणी करावी.
- सध्या फूल बाजार बंद आहे. त्यामुळे फूल कळी काढून मागणी नुसार पुढील काळामध्ये कळी ठेवून विक्री नियोजन करावे.
- पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा. शक्यतो जैविक खते आणि कीडनाशकांचा वापर करावा.
- बाजार भाव आणि शेतमाल पुरवठ्यासाठी ई-नाम संकेत स्थळाचा वापर करावा.
- बाजारपेठेतील परिस्थितीचा अंदाज घेऊन परदेशी भाजीपाला लागवडीचे नियोजन करावे.
- हरितगृह,शेडनेटचे वादळी वारे, अवकाळी पावसापासून नुकसान होते, हे लक्षात घेऊन विमा उतरवून घ्यावा.
- सध्याच्या लॉकडाउन कालावधीमध्ये बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्रातर्फे भाजीपाला पिकांची संरक्षित शेती या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येते. अधिक माहितीसाठी ०२११२-२५५५२७ किंवा ७०२०४६४६३२ या क्रमांकावर नोंदणी करावी.
संपर्क - यशवंत जगदाळे,९६२३३८४२८७
(उद्यानविद्या विशेष तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)
- ०२११२-२५५५२७
(प्रमुख,भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र,बारामती,जि.पुणे)
(उद्यानविद्या विशेष तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)
- ०२११२-२५५५२७
(प्रमुख,भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र,बारामती,जि.पुणे)
गाईवर झालेला वार्षिक खर्च आणि आलेले उत्पादन यातील फरक पाहावा. प्रथम वेतात योग्य आणि परिपूर्ण आहार देऊनही गाईपासून ४५०० लिटर (सरासरी १५ लिटर/प्रति दिन ) उत्पादन न मिळाल्यास ती गाई विकून नवीन खरेदी करावी.
सर्वात महत्वाचे जास्त दूध देणाऱ्या गाईपासून जास्तीत जास्त कालवडी कश्या मिळतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आणि विज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे आपण गाई भरवताना डॉक्टरकडे SEXED SEMEN ची मागणी करावी.
आपणास आवश्यक असणारे पशु खाद्य आणि इतर बाबी जसे कि खनिज मिश्रण इत्यादी शेतकरी गट तयार करून होलसेल दराने खरेदी करावे. तसेच शेण वर्षभर साठवून न ठेवता त्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत बनवुन विक्री करावे किंवा स्वतःसाठी वापरावे.
www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*
प्रगतिशील शेतकरी, कृषितज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, कृषी संस्थांचे पदाधिकारी, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी व शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहे. सर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहे. पण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहे. आज प्रत्येक जण लेखक आहे. प्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञान, सल्ला, कृषीविषयक माहिती, महत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल. जगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. कृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतीसल्ला, उपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध करा. कृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी व तज्ञांनी आपले लेख, माहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.*मोफत जाहिरात : आपली कृषी विषयक उत्पादने व सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकता. पोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवा. शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती व मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने व सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहे. त्वरा करा, एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जा. आपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.
*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*
www.shetisalla.com नियम व अटी :
*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.
*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज व टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.
*लेख हे स्वतःचे असावे. कॉपी नसावे.
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
|
|
|
![]() |
| अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा. |
![]() |
| अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा. |









0 Comments