Recents in Beach

For More Details Call On 9673371785

लसूण प्रक्रिया उद्योगासाठी पेस्ट अन्‌ फ्लेक्स यंत्र

हाताने लसूण सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू शकते. त्यासाठी हे लसूण सोलणी यंत्र उपलब्ध आहे. लसणाच्या फ्लेक्सचा वापर भाजी, ब्रेड व वेगवेगळ्या औषध उद्योगात केला जातो. ड्राय फ्लेक्सला बाजारामध्ये मागणी आहे. यासाठी आपल्याला स्लायसर व वाळवणी यंत्राचा उपयोग करावा.लसूण पावडरचा उपयोग बेकरी पदार्थामध्ये स्वाद आणण्यासाठी केला जातो. लसूण पावडर बनविण्यासाठी दळण यंत्रांचा वापर फायदेशीर ठरतो.
लसूण साल काढणारे यंत्र 
garlic pest machine

  • हाताने लसूण सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू शकते. त्यासाठी हे लसूण सोलणी यंत्र (गार्लिक पिलिंग मशीन) उपलब्ध आहे. लसणाच्या पाकळ्या हॉपरमध्ये टाकल्यानंतर फिरत्या स्क्रबर बॅरलच्या साह्याने लसणावर घर्षण होते. लसणाची साल वेगळी केली जाते. डि- स्क्रीनच्या साह्याने सोललेले लसूण हे खालच्या बाजूस कंटेनरमध्ये जमा होतात. लसणाची सोललेली साल प्रायटरच्या साह्याने बाहेर फेकली जातात. प्रायटरची गती हि १४४० फेरे प्रती मिनिट (आरपीएम) असते. या यंत्राची अचूकता ९० टक्क्यांपर्यंत असून, ताशी ३० ते ४० किलो लसूण सोलला जातो.  संपूर्ण स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या या यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागते. यंत्राचे वजन ४५ किलो असून, अर्धा एच पी ची विद्युत मोटार जोडलेली आहे. यंत्राच्या आतील भाग पूर्णपणे फूड ग्रेड स्टीलने बनवलेला असून यंत्र गरजेनुसार सिंगल फेज किंवा थ्री फेज उपलब्ध आहे.  
  • यंत्राची किंमत ४० हजारापासून पुढे आहेत. या स्वयंचलित यंत्रांमध्ये ड्राय पिलिंग व वेट पिलिंग असे दोन प्रकार आहेत. ड्राय पिलिंग यंत्राची किंमत ही वेट पिलिंग यंत्रापेक्षा जास्त आहे. 

 लसूण पेस्ट यंत्र 
  • लसणाची पेस्ट बनवणाऱ्या यंत्राच्या (गार्लिक पेस्ट मशीन) हॉपरमध्ये लसूण ओले करून टाकले जातात. तो चिरडण्यासाठी दोन रोलरच्या मध्ये दाब दिला जातो. रोलर उलट्या दिशेने फिरून चिरडलेला व बारीक झालेला लसूण चाळणीकडे पुढे ढकलला जातो.  
  • यंत्रामध्ये वेगवेगळ्या व्यासाच्या चाळण्या लावलेल्या असतात. त्याचा आकार हा २,४,६,८ मि.मी. असतो. त्यातून आपल्या आवश्यकतेनुसार पेस्ट मिळवता येते. तयार झालेली पेस्ट ही चाळणीतून कंटेनरमध्ये जमा होते. पॅक केली जाते. या यंत्राची 
  • क्षमता ताशी ८० ते १०० किलो असून, यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागते. यंत्रांचे सर्व भाग स्क्रशर, रोलर, कटर हे फूड ग्रेड स्टीलचे बनवलेले असते. यंत्र थ्री फेजवर चालते. यंत्राचे वजन ३० ते ४० किलो असून, हे अर्धस्वयंचलित आहे. यंत्राला ३ एच.पी. ची मोटार जोडलेली आहे. 
  • यंत्र एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी सोय केलेली आहे. या यंत्रामध्ये वेगवेगळ्या चाळण्याच्या मदतीने कांदा, आले, मिरची यांची पेस्ट करता येते. यंत्रांची किंमत १५ हजार रुपयापासून सुरु होते. हे यंत्र हाताळणीसाठी सोपं आणि सहज वापरता येईल असे आहे.  

लसूण फ्लेक्स यंत्र व ट्रे ड्रायर 
  • लसणाच्या फ्लेक्सचा वापर भाजी, ब्रेड व वेगवेगळ्या औषध उद्योगात केला जात असल्याने ड्राय फ्लेक्सला बाजारामध्ये खूप मागणी आहे.  यासाठी आपल्याला स्लायसर व वाळवणी यंत्राचा उपयोग करावा लागतो. लसूण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. त्यानंतर लसूण सोलून स्लायसरच्या साह्याने त्याचे बारीक बारीक फ्लेक्स बनवून घ्यावेत. हे फ्लेक्स ट्रे मध्ये ठेऊन ड्रायरमध्ये ८० अंश सेल्सिअस तापमानाला ७ ते ८ तासासाठी वाळवावेत. तयार झालेले फ्लेक्स वाळल्यानंतर एलडीपीई पिशवीमध्ये भरून हवाबंद केल्यास वर्षभर साठवता येतात.  ट्रे ड्रायर हे लोखंड व पत्र्याचे बनवलेले असतात. तर आतील भाग अॅल्युनिअमचा असतो. ट्रेच्या संख्येनुसार (६, ८, १२, ३६ , ४८, ७२, ९६) त्याचा आकार ठरतो.  यंत्राचे वजन ट्रेच्या संख्यानुसार कमी जास्त (६० ते ६५ किलोपर्यंत) असते. हे यंत्र थ्री फेजवर चालते. हे संपूर्णपणे स्वयंचलित ड्रायरमध्ये ५० ते २०० अंश सेल्सिअस तापमानपर्यंत उष्णता देता येते. 
  • याला डिजिटल फलकावर आतील तापमान व घटकांच्या नोंदी दिसत राहतात. आतील बाजूला लहान आकाराचा पंखा जोडलेला असतो. यंत्रांची क्षमता एका वेळेला १० किलोची असून यंत्राची किंमत ३० हजार रुपये आहे. क्षमतेनुसार यंत्रांची किंमत वाढते.  

लसूण दळण यंत्र  
  • लसूण पावडरचा उपयोग बेकरी पदार्थामध्ये स्वाद आणण्यासाठी केला जातो. लसूण पावडर बनविण्यासाठी दळण यंत्रांची (गार्लिक ग्राईन्डर मशीन) आवश्यकता असते. वाळलेल्या लसणापासून ग्राईंडरमध्ये भुकटी बनवली जाते. हे यंत्र पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. या यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागत असून, यंत्र थ्री फेज व सिंगल फेजवर चालते. वजन ३० किलोपर्यंत आहे. यंत्राला २, ४, ६, ८, १० मि.मी. च्या जाळ्या जोडलेल्या असतात. यंत्राला खालच्या बाजूला १० किलोची टाकी जोडलेली असते.
  • हे यंत्र अर्धस्वयंचलित असून, त्याची क्षमता ताशी ५० किलो आहे. या यंत्रांची किंमत २५ हजार रुपयांपासून पुढे आहे. 
  • अशा पद्धतीने ३ ते ४ लाखाच्या गुंतवणूकीतून शेतकरी स्वतःचा उद्योग उभारू शकतो. लसणाचे साठवणीतील नुकसान टाळण्यासोबतच मूल्यवर्धनातून नफा मिळवू शकतो. ज्या भागामध्ये लसणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, अशा गावांमध्ये अशी छोटी प्रक्रिया केंद्रे उभारणे फायद्याचे ठरते. प्रक्रियायुक्त पदार्थाच्या निर्मितीबरोबर पॅंकीगच्या एक दोन यंत्राचा समावेश करावा. आपल्या स्वतःच्या नावाने ब्रॅण्डींग करता येईल.

- सचिन मस्के, ९०४९९६७२५७
(पीएच. डी. विद्यार्थी, अन्न विज्ञान व तंत्रज्ञान विभाग,
सॅमहिंगिन बॉटम कृषी,  प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय,  प्रयागराज, उत्तरप्रदेश)

Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments