Recents in Beach

For More Details Call On 9673371785

मका उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रावर भर

 

यंदा पंधरा एकर क्षेत्रावर मका लागवडीचे नियोजन केले आहे. मी लागवडीसाठी टोकण पद्धतीचा वापर करतो. पीक वाढीच्या टप्यानुसार संतुलित खतमात्रा, पाणी व्यवस्थापनातून एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. ते वाढविण्याचा प्रयत्न आहे.

sweat corn

  •   आम्ही उन्हाळी कांद्याचे पीक घेतो. या पिकाच्या काढणीनंतर शेताची नांगरट करून पाळी, मोघडणी करतो. महिनाभर उन्हाळ्यात शेत तापवले जाते. पाऊस सुरु होण्याआधी लागवडीसाठी शेत तयार करून ठेवले जाते. 
  •  पूर्वी पांरपारिक पद्धतीने मका पेरणी करत होतो.आता टोकण पद्धतीने करत आहे. बळीराम नांगराने दोन फूट अंतरावर सरी पाडून त्यामध्ये सहा इंचावर बियाणे टोकण करतो. योग्य अंतरामुळे पिकाची चांगली वाढ होऊन कणीस देखील चांगले पोसते. 
  • आमच्याकडे जनावरे असल्याने शेणखत उपलब्ध होते.  संपूर्ण क्षेत्राला हे खत पुरत नसले तरी दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये शेणखत देतो. लागवडीआधी एकरी चार ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळून देतो. बळीराम नांगरामागे बियाणे टोकण करताना त्यासोबतच एकरी तीन गोणी मिश्र खत देतो. त्यानंतर खुरपणी केल्यावर दोन गोणी मिश्रखत दिले जाते.
  •  मकाच्या वाढीवर तणांचा परिणाम होत असल्याने काटेकोर तण नियंत्रण करतो. पीक साधारणपणे एक महिन्याचे झाल्यानंतर खुरपणी केली जाते. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन केले जाते.
  •  चांगल्या उत्पादनासाठी कीड,रोग नियंत्रण महत्त्वाचे असते. प्रादुर्भाव लक्षात घेऊन वेळेवर उपाययोजना करण्यावर माझा भर असतो. 

  - नागनाथ बेरगळ ः ९४०४६९५६११ 


Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments