Recents in Beach

For More Details Call On 9673371785

आरोग्यवर्धक उत्पादनांची वाढवली बाजारपेठ, लॉकडाऊनमध्येही प्रक्रिया उद्योग कार्यरत

सांगली
कायम दुष्काळ असलेल्या प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यवर्धक उत्पादनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरु केला. संकटं आली तरी न खचता त्यातून मार्ग काढत सुमारे १४ वर्षांपासून यशस्वी वाटचाल सुरु ठेवली. शेगाव (ता.जत, जि. सांगली ) येथील बोराडे पिता पुत्रांनी सध्याच्या लॉकडाऊनमध्ये संधी शोधताना संजीवनी ब्रँडने कोरफड, आवळा ज्यूस, तुळशी आणि गुळवेल अर्क यांचे उत्पादन सुरू ठेऊन आपल्या आरोग्यदायी उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सुमारे १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल करताना पूर्वीच्या बाजारपेठांमध्ये भर घालत कर्नाटकातील नव्या बाजारपेठा मिळवल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांबरोबर डाळिंब आणि द्राक्ष पिकावरही अवलंबून असतो. नैसर्गिक संकटांवर मात करून शेतीत विविध प्रयोग तो करीत असतो. सध्या कोरोना संकटाचा फटका सर्वच उद्योगांना बसला आहे. मात्र याच तालुक्यातील शेगाव येथील संभाजी व सुशांत या बोराडे पितापुत्रांनी या संकटाचे रूपांतर संधीत करीत आपल्या प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. गेल्या १४ वर्षांपासून शेती करण्याबरोबर प्रक्रिया उद्योगही सुरू ठेवला आहे.
कोरफड तसेच आवळा ज्यूस, तुळशी व गुळवेल अर्क अशी उत्पादने ते आपल्या आधुनिक यंत्रांनी सुसज्ज अशा युनिटमध्ये तयार करतात.

लॉकडाऊनमध्ये संधी
लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सांभाळण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. साहजिकच मेडिकल आणि आयुर्वेदिक उत्पादनांची दुकाने कायम सुरु आहेत. मात्र उत्पादन, वाहतूक व वितरण यात समस्या तयार झाल्याने या क्षेत्रातील अनेक कंपन्यांना आपला माल बाजारपेठेत पोचवणे अडचणीचे झाले होते. बोराडे यांनी ही संधी वेळीच ओळखली. त्यांनी आपल्या उत्पादन निर्मितीचे पद्धतशीर नियोजन केले. आपल्या आरोग्यदायी उत्पादनांची बाजारपेठ वाढवण्यास सुरुवात केली. संकटात न डगमगता केवळ चार मजूर व घरचे सदस्य यांच्या जोरावर उत्पादन निर्मिती युनिट सुरू केले. पूर्वीचे ग्राहक तसेच नव्या ग्राहकांना अर्थात अन्य मेडिकल दुकानांना संपर्क करण्यास सुरुवात केली. आता वाहतूक व वितरणाची सोय करण्याची गरज होती. मित्र, कृषी विभाग, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांचे व्यावसायिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा सुरु झाल्या. यातूनच आशेचा किरण दिसला. भाजीपाला वाहतुकीच्या वाहनांमधून माल पुरवठा करण्याची सोय झाली. भाडेशुल्क थोडे अधिक होते. तरीही संकटात विक्री व्यवस्था तयार होत होती, उत्पन्नाचे स्रोत वाढणार होते याचे समाधान होते. गेल्या काही वर्षांपासून मार्केटिंग कौशल्य वाढवण्याचे केलेले प्रयत्न व अनुभव उपयोगात आणला. गेल्या दहा ते चौदा वर्षांच्या काळात अनेक ग्राहक जोडले. मात्र लॉकाडाऊनच्या काळात ही संख्या वाढवली.

कच्च्या मालाची खरेदी
सध्या उत्पादन व कच्चा माल कमी पडू नये यासाठी सोलापूर, अथणी, इस्लामपूर येथील शेतकऱ्यांना बियाणे देवून सुमारे २१ एकरांत कोरफडीची करार शेती केली आहे. स्वतःच्या चार एकरांतही कोरफड आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कृष्णतुळशीची खरेदी होते.
तर आवळ्याची खरेदी वाशी मार्केटवरून होते.

बाजारपेठा
पूर्वीच्या पुणे, पिंपरी, चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर या बाजारपेठांबरोबर कर्नाटक राज्यातील धारवाड, हुबळी, विजापूर, अथणी, बेळगाव या बाजारपेठाही मिळवल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुमारे १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल करणे शक्य होत आहे.

प्रत्येक आठवड्यातील सध्याची विक्री
उत्पादन         विक्री (लीटर)              दर
कोरफड ज्यूस  १०० ते १५०        १०० रुपये प्रति लीटर
आवळा ज्यूस  . ५००                 २०० रु. प्रति ली.
तुळस अर्क.    ५००                १६० रुपये प्रति ४०० मिली
गुळवेल अर्क  ५००              १४० रुपये प्रति ५०० मिली
 
प्रतिक्रिया

कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले आहे. सर्व उद्योगांना फटका बसला आहे. या मंदीतून आपण मार्ग काढला पाहिजे. दोन पैसे मिळवलेच पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काम सुरू ठेवले. या काळात आरोग्यदायी उत्पादनांना असलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यांची अधिकाधिक विक्री करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे टाळेबंदीच्या काळातही आमच्याकडील उत्पादनांना मागणी वाढली होती हे विशेषत्वाने सांगावे लागेल.
कृषिभूषण संभाजी बोराडे, प्रकिया उद्योजक

संपर्क- सुशांत बोराडे : ९७६४६०५८००

News Item ID: 
820-news_story-1588939844-563
Mobile Device Headline: 
आरोग्यवर्धक उत्पादनांची वाढवली बाजारपेठ, लॉकडाऊनमध्येही प्रक्रिया उद्योग कार्यरत
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture story in marathi, food processing
Author Type: 
Internal Author
अभिजित डाके
Search Functional Tags: 
दुष्काळ, आरोग्य, Health, वर्षा, Varsha, सांगली, Sangli, वन, forest, कोरफड, aloe vera, पूर, Floods, कर्नाटक, रब्बी हंगाम, डाळ, डाळिंब, द्राक्ष, mate, शेती, farming, यंत्र, Machine, आयुर्वेद, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, इस्लामपूर, पुणे, कोल्हापूर, बेळगाव
Twitter Publish: 
Meta Keyword: 
agriculture story in marathi, food processing
Meta Description: 
कायम दुष्काळ असलेल्या प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यवर्धक उत्पादनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरु केला. संकटं आली तरी न खचता त्यातून मार्ग काढत सुमारे १४ वर्षांपासून यशस्वी वाटचाल सुरु ठेवली. शेगाव (ता.जत, जि. सांगली ) येथील बोराडे पिता पुत्रांनी सध्याच्या लॉकडाऊनमध्ये संधी शोधताना संजीवनी ब्रँडने कोरफड, आवळा ज्यूस, तुळशी आणि गुळवेल अर्क यांचे उत्पादन सुरू ठेऊन आपल्या आरोग्यदायी उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सुमारे १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल करताना पूर्वीच्या बाजारपेठांमध्ये भर घालत कर्नाटकातील नव्या बाजारपेठा मिळवल्या आहेत.

from News Story Feeds https://ift.tt/3ckuJ50
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

For More Information Click Here

Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments