Recents in Beach

For More Details Call On 9673371785

दुग्धव्यवसायातील नफा नुकसान आणि कार्यपद्धती

  दुग्धव्यवसायातील नफा नुकसान आणि कार्यपद्धती


www.shetisalla.com

         
  भारत हा जगात सर्वात जास्त पशुधन असलेला आणि सर्वात जास्त दूध उत्पादित  करणारा  देश अशी आपली ओळख आहे. या बद्दल आपणास अभिमानही वाटतो. आणि आपण याचे मुक्तहस्ते गोडवेही गात आलो आहे. अशी पार्श्वभूमी असतानाही आपण वारंवार दुग्ध उत्पादक आर्थिकदृष्टया अडचणीत सापडला आहे अशी बातमी वाचतो, ऐकतो . हे होण्यामागील काय कारणे आहेत ? याबद्दलही खूप अश्या चर्चा , सल्लामसलती होत असतात पण निष्पन्न काय होते तर काहीच नाही. त्यावर  तात्पुरती सर्वांना आवडीची अशी अनुदान नावाची मलमपट्टी केली जाते आणि नवीन काही अडचण येईपर्यंत आपल्या  दुग्धव्यवसायातील कामकाज चालू ठेवले जाते .
           दुग्धउत्पादक नेहमीच अडचणी जाणवल्यास परवलीचा झालेल्या अनुदान नावाचे अस्त्र हाती मिळणेसाठी मागणी करतो. परंतु खरंच अनुदान हे कायमस्वरूपी या दुगधव्यवसायातील अडचणी सोडवु शकेल का ? तर त्याचे स्पष्ट उत्तर नाही असे मिळेलदूध खरेदी किंमत हि बऱ्याच प्रमाणात जागतिक स्तरावर दूध पावडर मधील  किमतीत होणाऱ्या चढ उतारावर कमी जास्त होत असते. भारतात शेतीवर आणि शेतीपूरक व्यवसायावर ६० ते ६५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. आणि माझे वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे कि , एवढ्या मोठ्या घटकाच्या समस्या कोणतेही सरकार किंवा कोणतीही यंत्रणा एकहाती सोडवु शकत नाही. त्यासाठी दुग्धव्यवसायकाने स्वतःचा पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय सुवर्णमध्य गाठणे अशक्य आहे.

www.tiktok.com@yoursuperquotes
          शासन दुग्ध व्यवसायासाठी वेळोवेळी मदत करीत असते मग ते कमी किंमतीत किंवा मोफत उपचार ,मोफत लस , जनावरे खरेदीसाठी अनुदान , मार्गदर्शन आणि विविध योजना अश्या स्वरूपात असते. आणि निश्चितच याचा फायदा गरजूंना होत आला आहे. परंतु हि दुग्धव्यवसायाची फक्त प्रथम पायरी आहे. म्हणूनच व्यवसायातील यश अपयश पूर्णतः दुग्धउत्पादकाच्या हातात आहे. जिथे एकाच गावात तोटा सहन करून व्यवसाय करणारे शेतकरी आहेत तिथेच मुबलक नफा मिळवणारे देखील शेतकरी आहेत. हे होण्यामागील एकमेव कारण म्हणजे दुग्धव्यवसायातील त्यांची वेगवेगळी कार्यपद्धती ....
पारंपरिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीची पाहणी केल्यास  खालील चुका ठळकपणे दिसून येतात.
. गाई किंवा म्हैस खरेदी करताना कोणत्या बाबी तपासतात याची अपुरी माहिती असणे .
. हिरव्या तसेच  सुक्या चाऱ्याचे नियोजन नसणे . मुरघासाचा वापर करणे
. गाईची किंवा म्हशींची दूध देण्याची क्षमता समजणे आणि चुकीच्या पद्धतीचे आहार नियोजन करणे.
. दूध उत्पादनाचे जनावरानुसार रेकॉर्ड ठेवणे.
. घरी पशुखाद्य बनवता शेतकरी बाजारात उपलब्ध असणारे गोळीपेंड मोठ्या प्रमाणात वापरतात
. शेणाचे योग्य व्यवस्थापन आणि वापर करणे.
. जनावरामधील पिढीसुधार संबंधी कोणतेही नियोजन करणे किंवा माहिती नसणे.
. प्रत्येक जनावराचे वार्षिक उत्पादन आणि खर्च यांचा ताळेबंद नसणे.
. पावसाळा , हिवाळा , उन्हाळा या ऋतूप्रमाणे जनावरांना आरामदायक अशी  व्यवस्था तयार करणे.
       गाई किंवा म्हैस खरेदी करताना कोणत्या बाबी तपासतात याची अपुरी माहिती  असल्याने कमी दूध देणारी जनावरे खरेदी केली जातात आणि पर्यायाने नुकसान सहन करावे लागते. गाईचा विचार केल्यास नेहमी प्रथम वेताची गाई खरेदी करावी. गाईचे वजन किमान ४५० किलो असावे. गाई सहा ते सात महिन्याची गाभण असावी. गाईचे  मागील पाय सरळ असावेत. गाईचा मागील भाग हा जास्तीत जास्त रुंद असावा. गाईला शिंगे नसावीत त्यामुळे गाई हाताळण्यास सोपे होते. गाईचे सड एकाच आकाराचे असावेत. गाईची उंची किमान १४० सेंटीमीटर असावी. गाईची त्वचा आणि डोळे तजेलदार असावेत. गाई लांबीने जास्त असावी
     
www.shetisalla.com

गाईपासून
  दूध उत्पादन नियमित आणि योग्य प्रमाणात मिळणेसाठी सारखा सारखा आहारात बदल करणे हा महत्वाचा नियम असतो . तोच शेतकरी पाळत नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी मुरघास तयार करून  जनावरांना वर्षभर दिला पाहिजे जे ने करून एकाच प्रकारचा चारा मिळेल . तसेच जास्त प्रथिने युक्त लसूणघास , तुती , अझोला यांचा आहारात वापर केल्यास पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो. शेतकरी स्वतःच्या समजुतीप्रमाणे गाई /म्हैस किती दूध देईल किंवा देते याचा अंदाज करून आहार ठरवतात जे कि पूर्णपणे चुकीचे आहे. सर्वसाधारणपणे एका वेताचे खालील पाच टप्पे असतात.
. अर्ली लॅक्टशन (पहिले १०० दिवस)
. मिड लॅक्टशन (१०१ ते २०० दिवस )
. लेट लॅक्टशन (२०१ ते ३०० दिवस)
. दूध देण्याचा काळ (३०१ ते ३४० दिवस)
.पुन्हा गाई  विण्यापूर्वीचे २५ दिवस
 वरील टप्प्यानुसार अनुक्रमे १८ , १६ , १४ , १२ , १४ टक्के प्रथिनेयुक्त आहार देणे गरजेचे असते.


www.shetisalla.com
For Service Inquiry Call : 9673371785

                 गाईवर झालेला वार्षिक खर्च आणि आलेले उत्पादन यातील फरक पाहावा. प्रथम वेतात योग्य आणि परिपूर्ण आहार देऊनही गाईपासून ४५०० लिटर (सरासरी १५ लिटर/प्रति दिन ) उत्पादन मिळाल्यास ती गाई विकून नवीन खरेदी करावी.
     सर्वात महत्वाचे जास्त दूध देणाऱ्या गाईपासून जास्तीत जास्त कालवडी कश्या मिळतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आणि विज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे आपण गाई भरवताना डॉक्टरकडे SEXED SEMEN ची मागणी करावी.
         आपणास आवश्यक असणारे पशु खाद्य आणि इतर बाबी जसे कि खनिज मिश्रण इत्यादी शेतकरी गट तयार करून होलसेल दराने खरेदी करावे. तसेच शेण वर्षभर साठवून ठेवता त्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत बनवुन विक्री करावे किंवा स्वतःसाठी वापरावे. 


www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*

प्रगतिशील शेतकरीकृषितज्ञकृषी शास्त्रज्ञकृषी अधिकारीकृषी संस्थांचे पदाधिकारीकृषी क्षेत्रातील विद्यार्थी  शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहेप्रिंट मीडियाटीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहेसर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहेपण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहेआज प्रत्येक जण लेखक आहेप्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहेजगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञानसल्लाकृषीविषयक माहितीमहत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईलजगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहेशेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहेकृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.

आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथानाविन्यपूर्ण प्रयोगशेतीसल्लाउपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध कराकृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी  तज्ञांनी आपले लेखमाहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.



*मोफत जाहिरात आपली कृषी विषयक उत्पादने  सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकतापोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवाशेतीविषयक महत्वपूर्ण माहिती  मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने  सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहेत्वरा कराएका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जाआपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.



*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*

www.shetisalla.com नियम  अटी :

*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.

*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज  टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.

*लेख हे स्वतःचे असावेकॉपी नसावे.









Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments